मुंबईचे डॅडी अरूण गवळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धावून आलेले वादळ.. - दत्ता इंद्रमोहन वाकसे जिल्हाध्यक्ष धनगर समाज संघर्ष समिती बीड
मुंबईचे डॅडी अरूण गवळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धावून आलेले वादळ..

 


 

आज संपुर्ण जगामध्ये खूप मोठा प्रमाणात कोरोना सारख्या रोगाने थैमान घातले आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर जेलमधून पेरेलवर बाहेर आलेले माजी आमदार आणि वंदे मातरम सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरूण भाई गवळी यांनी सामाजिक कार्यात चांगलीच  उच्चांक गाठला आहे,  मुंबई शहरातील आणि भायखळा विधानसभा क्षेत्रातील गोरगरीब वंचित आणि हातावर पोट असणाऱ्या हजारो गरीब कुटुंबांना हजारो क्विंटल गहू तांदूळ यासह तेल डाळ भाजीपाला अन्नधान्य देऊन सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत. आजमितीला संपूर्ण जगामध्ये आणि भारतातील प्रत्येक सामाजिक कार्यरत असणाऱ्या व्यक्तीकडून सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे त्याच पार्श्वभूमीवर भायखळा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आणि वंदे मातरम सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरुण भाई गवळी हे एक सामान्य माणसाचे आणि मुंबईकरांचे देवदूत बनले आहेत. उत्तर प्रदेश मध्यप्रदेश छत्तीसगढ आंध्रप्रदेश कर्नाटक विविध राज्यातून मुंबई शहरामध्ये काम करण्यासाठी आलेल्या मजुरांना उपाशीपोटी झोपू न देण्याचं त्यांनी एक प्रकारे विडाच उचलला आहे. सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत रोज जीवनावश्यक वस्तू ते पोहोचवत आहेत. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे आणि एक मराठी माणूस सामान्य माणसाला कसा जगू शकतो हे याच्या माध्यमातून कळत आहे त्याचबरोबर वंदे मातरम सेनेच्या नगरसेविका सन्माननीय गीता ताई गवळी आणि अरुण भाई गवळी देखील त्यांच्या समाजकार्याला हातभार लावत आहेत. सामाजिक माणूस कसा जगला याला महत्व नाही परंतु किती लोकांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करून गेला हे महत्त्वाचा आहे. आजमितीला आदरणीय विधानसभा भायखळा क्षेत्राचे माजी आमदार आणि वंदे मातरम सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरुण भाई गवळी हे दलित गोरगरीब कष्टकरी कामगार आणि वंचित असलेल्या कुटुंबांना रोज पोट भागवण्यासाठी स्वखर्चातून हजारो क्विंटल गहू तांदूळ यासह तेल डाळी भाजीपाला यासह अनेक जीवनावश्यक वस्तू वाटप करत आहेत. त्याच्या माध्यमातून सामाजिक जीवन जगत असताना त्यांनी अरुण भाई गवळी यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सामाजिक बांधिलकी जोपासून वंचित दलित कष्टकरी कामगार गोरगरीब या सामान्य माणसाला त्याच्या मूलभूत गरजा त्याला आधार देण्याचे काम त्यांनी केले आहे. आज पाहिलं तर संपुर्ण जगामध्ये कोरोनासारख्या रोगाने  थैमान घातले आहे त्यामुळे मुंबईतील मराठी माणूस खरोखरच सामान्य माणसाला आधार देऊ शकतो आणि त्या आजाराच्या माध्यमातून सामान्य माणूस जीवन जगू शकतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

 


दत्ता इंद्रमोहन वाकसे

जिल्हाध्यक्ष धनगर समाज संघर्ष समिती बीड