कोरोना प्रतिबंधासाठी "मिशन झिरो अंबाजोगाई" मोहीम राबविणार
17,18 आणि 19 ऑगस्ट रोजी व्यापा-यांची रॅपीड अँटिजेन चाचणी होणार
======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई शहरात कोरोना साथजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून 'मिशन झीरो अंबाजोगाई' ही मोहीम नगरपरिषद अंबाजोगाई, राज्य सरकारचा आरोग्य विभाग, भारतीय जैन संघटना,रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी आदींच्या वतीने दिनांक 17,18 आणि 19 ऑगस्ट 2020 रोजी राबविण्यात येणार आहे.या मोहीमेअंतर्गत अंबाजोगाई शहरातील व्यापारी बांधवांची मोफत अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे.तरी 'मिशन झीरो अंबाजोगाई' या मोहिमेत जास्तीत-जास्त व्यापारी बांधवांनी सहभागी होवून आपली अँटिजेन चाचणी करून घ्यावी असे आवाहन अंबाजोगाई नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा सौ.रचनाताई सुरेश मोदी,उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे, मुख्याधिकारी यांनी केले आहे.
अंबाजोगाई नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनानुसार 'मिशन झीरो अंबाजोगाई' या एकात्मिक कृती मोहीमेच्या माध्यमातून पुढील काही दिवसांत शहरातील अंबाजोगाई शहरातील (कन्टेन्मेंट झोन सहीत) व्यापारी बांधव आणि त्यांचे कडील कामगार वर्ग यांच्या अॅण्टिजेन चाचण्या होऊन पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येतील.या चाचण्यांमुळे पॉझिटिव्ह सापडलेल्या व्यक्ती, लक्षणे असलेल्या तसेच वयस्कर व इतर आजार असलेल्या व्यक्तींची तपासणी होईल.यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांना शोधून काढण्यात यश येईल.अशा रूग्णांवर लगेच उपचार करणे शक्य होईल.अशा रूग्णांवर योग्य ते उपचार करणे,त्यांचे समुपदेशन करणे,रूग्णांचा पाठपुरावा करणे,कुटुंबातील व संपर्कातील इतर सदस्यांची तपासणी करणे सोयीचे होईल. यामुळे संबंधित रूग्ण लवकर बरे होऊन पुढील होणारे संक्रमणही थांबेल.'मिशन झीरो अंबाजोगाई' ही मोहीम यशस्वी होईल.अनेकदा असे दिसून येत आहे की,रूग्ण गंभीर झाला तरी शासकीय रूग्णालयात लवकर दाखल केला जात नाही. रूग्ण दवाखान्यात येण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले पाहिजे.शहराच्या सर्व प्रभागांतील (कन्टेन्मेंट झोन सहीत) विविध परिसरांतील व्यापा-यांची तपासणी करून पॉझिटिव्ह रूग्ण शोधून काढण्यात फिल्डवरील आरोग्य कर्मचा-यांना सहज शक्य होईल.'मिशन झीरो अंबाजोगाई' करिता नगरपरिषद अंबाजोगाई व आरोग्य विभागाचे कर्मचारी व स्वयंसेवी कार्यकर्त्यांची टीम उपलब्ध आहे.व्यापारी बांधवांनी न घाबरता पुढे येऊन मोफत रॅपिड अॅण्टिजेन टेस्ट करून घ्याव्यात. कारण,यापुढे अंबाजोगाई शहरामध्ये व्यवसाय करणेसाठी व्यापारी बांधवांना अॅन्टीजन टेस्ट करून घेणे अनिवार्य राहील याची नोंद घ्यावी असे नमुद करण्यात आले आहे.
"मिशन झिरो अंबाजोगाई" मोहीम
==================
अंबाजोगाई शहरातील कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी व बीड जिल्ह्याच्या.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी तयार केलेल्या समितीत तहसीलदार,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी,आरोग्य सहाय्यक, आरोग्य कर्मचारी,गटशिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे.अंबाजोगाईत "मिशन झिरो" मोहीमेला भारतीय जैन संघटनेचे संघटक धनराज सोळंकी, तालुकाध्यक्ष निलेष मुथा,रोटरीचे उपप्रांतपाल संतोष मोहीते,रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीचे अध्यक्ष डॉ.निशिकांत पाचेगावकर, सचिव कल्याणराव काळे आदींचेही सहकार्य लाभणार आहे.
रॅपीड अँटिजेन चाचण्यांसाठी 4 केंद्र
=================
अंबाजोगाई शहरात कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेशानुसार आणि बीड जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली प्रतिबंधक उपाययोजनाची अंमलबजावणी करणेसाठी तहसीलदार संतोष रूईकर यांचे नियंञणखाली अंबाजोगाई शहरातील (कन्टेन्मेंट झोन सहीत) सर्व व्यापारी, व्यावसायिक यांची रॅपीड अॅन्टीजन टेस्ट आरोग्य विभागामार्फत दिनांक 17.18 व 19 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत करण्यात येणार आहेत.रॅपीड अँटिजेन चाचण्यांसाठी व्यापारी व त्यांच्या कामगारांच्या नाकातील स्ञावाचे नमुने (स्वॅब) तपासणी करिता घेण्यात येतील.या तपासण्या पुर्णपणे मोफत असून फिजीकल डिस्टन्स पाळून व शासन निर्देशानुसार शहरातील 4 केंद्रांवर करण्यात येतील.