संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षपदी प्रविण ठोंबरे यांची निवड
======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
संभाजी ब्रिगेडने बीड पुर्व जिल्हाध्यक्षपदी प्रविण उत्तमराव ठोंबरे यांची निवड केली आहे. गुरूवार,दिनांक 13 ऑगस्ट रोजी जिजाऊसृष्टी,सिंदखेडराजा येथे ठोंबरे यांचेसह मराठवाडा विभागाच्या सर्व जिल्ह्यातील नवनियुक्त जिल्हाध्यक्ष यांना नियुक्तीपत्र देवून मार्गदर्शन करण्यात आले.
अंबाजोगाई येथील प्रविण उत्तमराव ठोंबरे यांनी मागील 15 वर्षांत मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष,संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष तसेच औरंगाबाद विभागाचे उपाध्यक्ष आदी विविध पदे भूषविली.मागील 3 वर्षांपासून बीड जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी माजलगाव,धारूर,केज, अंबाजोगाई आणि परळी तालुक्यात संभाजी ब्रिगेडच्या विस्तारासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.त्यांचे पक्षवाढी साठीचे प्रामाणिक प्रयत्न,विद्यार्थी आणि शेतक-यांसाठी दिलेली विविध निवेदने, केलेली अनेक आंदोलने,धरणे, उपोषण,बंद,मोर्चे,अंबाजोगाई जिल्हा निर्मिती साठीचे आंदोलन, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठीचा लढा,विविध उपक्रमांचे आयोजन,कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर,शाखा बांधणी,संघटन बळकट करणे,लोकसभा,
विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत संभाजी ब्रिगेडचा विचार सर्वदूर पोहोचविला.प्रविण ठोंबरे यांनी सामाजिक बांधिलकी मानून केलेले कार्य तसेच ते अनेक वर्षांपासून पुरोगामी चळवळीत सक्रिय आहेत. त्यांची सामाजिक व राजकीय वाटचाल या सर्व कार्याची दखल घेऊन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड.मनोजदादा आखरे यांनी प्रविण ठोंबरे यांची बीड पुर्व जिल्हाध्यक्षपदी निवड करून त्यांना शुभेच्छा दिल्या.बीड पुर्व मध्ये केज व परळी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.दरम्यान आपल्या निवडीविषयी आभार मानून बोलताना प्रविण ठोंबरे यांनी सांगितले की,संभाजी ब्रिगेडने काही नवीन आघाड्या स्थापन केल्या आहेत.त्यांच्या नियुक्त्या करून पक्ष संघटन वाढीवर भर देणार आहोत. समाजातील प्रश्न सोडविणार आहोत."शेतक-यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात" हे ब्रीद घेऊन मराठा सेवा संघाचे संस्थापक अॅड.पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड.मनोजदादा आखरे,महासचिव सौरभदादा खेडेकर,संतोषजी गाजरे पाटील,डॉ.सुदर्शन तारख,प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे, डॉ.बालाजी जाधव,माजी जिल्हाध्यक्ष गोविंद पोतंगले, अतुलजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सामान्य माणसांवर होणा-या अन्याय-अत्याचारा विरूद्ध लढण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून 24 तास जनसेवेसाठी उपलब्ध असेन असे नवनिर्वाचित बीड पूर्वचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठोंबरे यांनी सांगितले.त्यांच्या या निवडीबद्दल मराठा सेवा संघ बीड पुर्वचे जिल्हाध्यक्ष रामकिसन मस्के, अशोक ठाकरे,माजी जिल्हाध्यक्ष राहुल वायकर,संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा प्रसिध्दीप्रमुख रणजित डांगे, धर्मराज सोळंके,अंगद गायकवाड, अरूण गंगणे,नानासाहेब धुमाळ आदींसह इतरांनी अभिनंदन केले आहे.