राज्यस्तरीय संगीत संमेलनाच्या अध्यक्षपदी सोलापूर सुरमणी मोहम्मद अयाज..
--------------------------------------------------------------
सोलापूर ः म.सा.प.दामाजीनगर ,सुरसंगम ग्रुप व अ.भा.मराठी नाटय परिषद शाखा मंगळवेढा यांचे संयुक्त विद्यमाने 15 व 16 ऑगस्ट रोजी होणार्या राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलनाच्या अध्यक्षांच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत.
यात साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विटा येथील अक्षरयात्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रा.डॉ.स्वाती शिंदे-पवार तर संगीत संमेलनाच्या अध्यक्षपदी सोलापूर येथील महाराष्ट्राचा महागायक विजेता मोहम्मद आयाज यांच्या निवडी करण्यात आल्या.
या बैठकीस संयुक्त संमेलनाचे अध्यक्ष प्रा.लक्ष्मणराव ढोबळे, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अॅड.नंदकुमार पवार, संगीत संमेलनाचे स्वागताध्यक्ष अॅड.सुजित कदम, म.सा.प.दामाजीनगरचे अध्यक्ष प्रकाश जडे, सुरसंंगम म्युझिकल ग्रुपचे प्रमुख दिगंबर भगरे यांचेसह डॉ.शरद शिर्के, लहू ढगे आदि प्रमुख संयोजक उपस्थित होतेे.